सावर्डे पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यात तीन जणांना अटक, ₹1.34 कोटींचा 100% मुद्देमाल जप्त

सावर्डे : सावर्डे पोलीस ठाण्याने चोरीच्या एका मोठ्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करून ₹1,34,24,589/- किंमतीचा 100% मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सावर्डे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 56/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 3(5) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात ₹74,84,098/- किंमतीचे 450 लोखंडी इलेक्ट्रीक पोल, सावर्डे महावितरण सब स्टेशनजवळ सचिन वारे यांच्या वहाळ फाटा येथील मोकळ्या जमिनीवर ठेवलेले होते.

हे पोल फिर्यादी अखिलेश कुमार लालताप्रसाद प्रजापती (वय 47, मूळ रा. विरार ईस्ट, पालघर, सध्या रा. खेड, रत्नागिरी) यांच्या परवानगीशिवाय ट्रेलरद्वारे चोरून नेण्यात आले होते. फिर्याद दाखल झाल्यानंतर सावर्डे पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान दोन ट्रेलर कोलाड (रायगड) आणि एक ट्रेलर कामथे येथे आढळले.या गुन्ह्यातील तीन आरोपी चालकांना अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे: 1) सुरेश नंदलाल खारोल (वय 24, रा. अजमेर, राजस्थान), 2) पिंटु भना (वय 22, रा. अजमेर, राजस्थान), 3) पुखराज श्रीकिशन भील (वय 22, रा. अजमेर, राजस्थान). या तिघांकडून 450 लोखंडी इलेक्ट्रीक पोल आणि ट्रेलर जप्त करण्यात आले असून, त्याची एकूण किंमत ₹1,34,24,589/- आहे.

अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 10 जून 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. आबासो पाटील यांनी केला.

तपासात सहभागी असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांची नावे खालीलप्रमाणे: पो.उप.नि. गमरे, पो.हवा. साळुंखे, पो.हवा. कांबळे, पो.हवा. कोळेकर, म.पो.हवा. कान्हेरे, पो.हवा. कांबळे, पो.शि. भांगरे, पो.शि. जड्यार, म.पो.कॉ. मुंढे, म.पो.कॉ. जाधव, पो.कॉ. चव्हाण, पो.कॉ. साठे.

सावर्डे पोलिसांनी या गुन्ह्यात 100% मुद्देमाल हस्तगत करून तपासात यश मिळवले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*