दापोली । प्रतिनिधी

विभागवार निकाल

वाणिज्य शाखा- 100%
विज्ञान शाखा – 100%

दापोली : ज्ञानदीप संचालित संतोषभाई मेहता वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविदयालयाचा १२वीच्या वाणिज्य शाखेतील कळावे हुसेन तबीश यानं ८८ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. जमादार ज़िनत जावेद ८६.९२ टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच रषदा इबादुल्ला मुंग्रुसकर ८४.१५ तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

भेकरे यामिनी दिलीप आणि काळावे हुसैन ताबिश

विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून विज्ञान शाखेतील भेकरे यामिनी दिलीप ७६.३० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम कमांक प्राप्त केला आहे. महाविदयालयाने आतापर्यंत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

यशस्वी विदयार्थ्यांचे संस्थाध्यक्ष संतोषभाई मेहता, उपाध्यक्षा शांता सहस्त्रबुद्धे, चिटणीस सुजय मेहता, सहचिटणीस विश्वासकाका कदम, खजिनदार हसमुख जैन, शालेय समिती चेअरमन संकेत मेहता, संस्था पदाधिकारी सौ.सरोज मेहता, श्री.विजय पवार, सौ. सुहासिनी कोपरकर, भाग्यश्री करमरकर, गोपीनाथ महाडीक, शुभांगी गांधी, अशोक सावंत, रविंद्र कालेकर, गोविंद पवार, सुयोग मेहता, मुख्याध्यापक मधुकर मोरे, विभाग प्रमुख प्रविण कदम, विज्ञान विभाग प्रमुख अंकित कदम, वाणिज्य विभाग प्रमुख मुस्तकिम रखांगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

– माय कोकण
https://mykokan.in