सांबरे रुग्णालयातून खरी जनसेवा होणार : खा. नारायण राणे

रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या श्री भगवान सांबरे मोफत रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी हजेरी लावली.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांना शुभेच्छा देताना खा. राणे म्हणाले, “रत्नागिरीत सुरू झालेल्या या रुग्णालयामुळे खऱ्या अर्थाने आरोग्यसेवा जनतेपर्यंत पोहोचणार आहे.

रत्नागिरी आणि परिसरातील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि चांगले ठेवण्यासाठी निलेश सांबरे यांचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे.

मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जावा, अशी सदिच्छा व्यक्त करतो.”

खा. राणे पुढे म्हणाले, “या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी येथे आलो आहे. तुम्हा सर्वांना पाहून मला खूप आनंद झाला.”

लोकहित, लोककल्याण आणि प्रगतीच्या दृष्टिकोनातून राबवल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासनही खा. राणे यांनी यावेळी दिले.

या रुग्णालयाच्या माध्यमातून रत्नागिरी आणि परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून, हा उपक्रम स्थानिक समाजासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*