रत्नागिरी : उपासमारीची वेळ आलेल्या आणि लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून बंद असलेल्या सलून आणि जीम व्यावसायिकांना राज्य सरकारच्या निर्णयानं दिलासा मिळाला आहे. येत्या रविवारपासून म्हणजे २८ जून २०२० पासून राज्य मंत्रीमंडळानं सलून आणि जीम सुरू करण्याला परवानगी दिली आहे.

सलून सुरू करण्यासंदर्भात नाभिक समाजानं राज्यभरात सतत्यानं आंदोलनं केली होती. रत्नागिरी जिल्ह्यातही ७ दिवस हत्यारबंद आंदोलन करून त्यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधून घेतलं होतं. आमची परिस्थिती खरच वाईट आहे, ती सरकारनं समजून घ्यावं असा संदेश त्यांनी दिला. या सगळ्यांची दखल घेत अखेर आता हेअर कटींग सलूनला परवानगी मिळाली आहे.

जीम व्यवसायिकांचीही परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यांच्यावरही उदरनिर्वाहाचं संकट ओढवलं होतं. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं त्यांनीही स्वागत केलं आहे.

या दोन्ही व्यावसायिकांना खबरदारी मात्र प्रचंड घ्याव्या लागणार आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.