रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि विद्यमान जि.प. सदस्य स्नेहा सुकांत सावंत यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अशा निधनानं अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.

स्नेहा सावंत या शिरगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या होत्या. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढाईत त्यांनी संघर्षपूर्ण विजय मिळवला होता. याचेच फळ म्हणून पहिल्या सव्वा वर्षासाठी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला होता. सव्वा वर्षांची त्यांची अध्यक्षपदाची कारकीर्द यशस्वी ठरली होती. सध्या त्या जिल्हा परिषदेत जलव्यवस्थापन समिती मध्ये काम पहात होत्या.

मागील दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. शनिवारी रात्री त्यांना उपचारासाठी डॉक्टरकडे घेऊन जात असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. शनिवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.