रत्नागिरीत २२ आणि २३ मार्च रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

डॉ. भिमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

रत्नागिरी: भारतीय बौद्ध महासभेतर्फे रत्नागिरी शहरामध्ये २२ आणि २३ मार्च २०२५ रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या धम्म परिषदेचे उद्घाटन तसेच चर्चासत्र २२ मार्च रोजी रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गिरिराज हॉटेलच्या सभागृहात होणार आहे, तर २३ मार्च रोजी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये खुली धम्म परिषद होईल.

या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉ. हरिश रावलिया आणि रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ऍड. सुभाष जोंजाळे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

२२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आदरांच्या प्रतिमांचे पूजन आणि भंते ए. सुमेधबोधी यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

दुपारी १२ वाजता भारतीय संविधान या विषयावर संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड. जगदीश गवई हे मार्गदर्शन करतील, दुपारी १ वाजता भोजन, दुपारी २ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान कशी करावी, या विषयावर राष्ट्रीय सचिव वसंत पराड, दुपारी ३ वाजता भारतीय रूढी-परंपरा आणि विज्ञान या विषयावर राज्य सरचिटणीस अशोक केदारे मार्गदर्शन करतील.

दुपारी ४ वाजता बौद्धांचे धार्मिक विधी संस्कार काय करावेत आणि काय करू नयेत, या विषयी शंका समाधान आणि निरसन, तर सायंकाळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये भंते ए. सुमेधबोधी यांची जाहीर धम्मदेसना होणार आहे.

२३ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तेथून प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या मैदानापर्यंत भिक्खू संघाची धम्म रॅली काढण्यात येईल.

प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी ११ वाजता आदरांच्या प्रतिमांचे पूजन, भंते ए. सुमेधबोधी यांच्याकडून त्रिसरण पंचशील ग्रहण आणि मान्यवरांचे स्वागत तसेच सत्कार करण्यात येईल.

प्रमुख मार्गदर्शक आणि पूज्य भंते ए. सुमेधबोधी यांची धम्मदेसना, दुपारी ३ वाजता भोजनदान असे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेसाठी संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड. एस. के. भंडारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड. एस. एस. वानखेडे, राष्ट्रीय उपाध्यक्षा सुषमा पवार, राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड, भिकाजी कांबळे, यु. जी. बोराडे, प्रशांत गडकरी, जयवंत लव्हांडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी जास्तीत जास्त लोकांनी या धम्म परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस एन. बी. कदम, कोषाध्यक्ष प्रदीप जाधव, उपाध्यक्ष विजय जाधव, डॉ. जनार्दन माहिते, शरणपाल कदम, राजापूर तालुकाध्यक्ष सत्यवान जाधव, लांजा तालुकाध्यक्ष आर. बी. कांबळे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष विजय मोहिते, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राहुल मोहिते, चिपळूण तालुकाध्यक्ष जयरत्न कदम, गुहागर तालुकाध्यक्ष विद्याधर कदम, खेड तालुकाध्यक्ष ए. के. मोरे, दापोली तालुकाध्यक्ष अनिल धाडगे, मंडणगड तालुकाध्यक्ष हर्षद जाधव, तुषार जाधव, अनंत जाधव, राहुल पवार, भगवान जाधव यांनी केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*