रत्नागिरी : येथील एम.एस्. नाईक स्कूल, चाईल्ड केअर नर्सरी आणि प्राथमिक विभागात रमजान निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये लहान विद्यार्थ्यांनी ‘सुरह अल आला’, ‘नाशीद’, छोटी भाषणे आणि ‘नजम’सारखे कार्यक्रम सादर केले, ज्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अश्फाक नाईक, प्राथमिक व नर्सरी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. आरिफा म्हालदार आणि मौलाना जकी सिद्दीकी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री. सिद्दीक बारगीर यांनी उत्तमरित्या केले, तसेच कार्यक्रमाचे नियोजन मौलाना उसामा हज्जू व हाफिज शब्बीर हज्जू यांनी केले.
आरिफा म्हालदार यांनी आपल्या भाषणात मुलांना रमजान महिन्याचे महत्त्व सांगितले, तर मौलाना जकी यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी हाफिज शब्बीर यांनी सर्व पाहुणे, शिक्षक आणि उपस्थित लोकांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेतील लहान मुलांना रमजान महिन्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजले.