रत्नागिरी – रविवारी दि. 22 डिसेंबरला सायंकाळी 6 वा. उदय सामंत यांच्या हस्ते व रत्नागिरीमधील नामांकित सीए श्रीरंग वैद्य यांच्या उपस्थितीत राजेश सोहोनी यांच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी सोहोनी कुटुंबीयांनी ना. सामंत यांचे स्वागत केले. यावेळी रत्नागिरीतील अनेक सी. ए. तसेच रत्नागिरीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
ना. सामंत यांनी राजेश सोहोनी यांच्या नवीन कार्यालयीन उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.