दापोली:- दापोली पोलीस ठाण्यातील १० पोलीस कर्मचाऱ्यांना बढती मिळाली आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील २१२ कर्मचाऱ्यांना बढती मिळाली असून त्यातील १० कर्मचारी दापोली पोलीस ठाण्यातील आहेत. हवालदार मयूर मोर, सखाराम निकम व मंदार हळदे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असून पोलीस नाईक सुवर्णा ढेरे यांना हवालदार तर सागर कांबळे, मोहन देसाई, सुहासिनी मांडवकर, सुनिल पाटील, निलेश जाधव व सोनाक्षी गावडे यांना पोलीस नाईक पदावर बढती मिळाली आहे.