दापोली- अखिल भारतीय खेळ महासंघ यांचेकडुन तायक्वांडो या क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दत्य दापोलीची सुकन्या प्राजक्ता अरूण माने ऊर्फ साहसी हिचा राष्ट्रीय डायमंड पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आला.

७ फेब्रुवारी रोजी बारामती जिल्हा पुणे येथे मराठी अभिनेत्री कल्याणी चौधरी,आयर्नमॅन किताबाचे मानकरी सतीश ननवरे,भारतीय खेळ महासंघाचे समन्वयक युसूफ मलीक तसेच महाराष्ट्र खेळ संघाचे युनिक हेड आशिष डोईफोडे, पॅरा कमांडो इंडियन आर्मीचे अशोक हिंगवले या मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दापोली येथील प्राजक्ता या तायक्वांडो या ऑलिंपिक मान्यनाप्राप्न खेळाच्या ब्लॅक बेल्ट धारक खेळाडू, प्रशिक्षक तथा राष्ट्रीय पंच आहेत.

त्या गेल्या १३ वर्षापासून या खेळात प्रावीण्य मिळवून आहेत. अनेक तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय खेळाडू त्यांनी घडवले आहेत. तसेच पंच म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना हा मनाचा पुरस्कार देण्यात आला आहे.

या यशाबद्दल त्यांचे रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश करा् आदी पदाधिकारी तसेच तायक्वांडो स्पोर्ट्स फाऊंडेशन दापोली संस्थेचे अध्यक्ष भारतीय नौदलाचे माजी प्रमुख अँँडमिरल विष्णू भागवत आदी मान्यवरांकडुन प्राजक्ता माने यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहेत.