दापोली : दिनांक १०/०७/२०२४
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविद्यायाच्या कृषी भूमिकन्या गटाच्या विद्यार्थिनींनी देहन येथे ग्रामीण जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत चार सूत्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेतले.

या कार्यक्रमात कृषी अधिकारी सुनील कुवर व देहेन गावच्या सरपंच ममता तांबे, सुकोंडी व बोरथळ गावचे सरपंच रमेश हुमणे आणि केळशी समन्वयक जयेश हुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची रूपरेषा आखली गेली.

या कार्यक्रमाची सुरुवात खताचे झाड/गिरिपुष्पचा पाला शेतात टाकून झाली. मातीमध्ये  नत्राचे प्रमाण युरिया न टाकता वाढवण्यासाठी खताच्या पाल्याचा वापर करण्याचे महत्त्व  शेतकऱ्यांना सांगितले. त्यानंतर  टिलर कम विडर फिरवून पाल्याला मातीत एकजीव करण्यात आल. पुढे दोरीच्या साह्याने रोपांची पुनर्लागवड /लावणी करण्यात आली.

महिला शेतकऱ्यांनी लावणीच्या वेळी पारंपरिक गीत सादर केले. लावणी झाल्या नंतर युरिया ब्रिकेट्सचा उपयोग, युरिया खता  ऐवजीचा वापर व त्यांचे फायदे या बद्दल शेतकऱ्यांना माहिती सांगितली.

या वेळी देहेण गावच्या सरपंच ममता तांबे आणि सुकोंडी व बोरथळ गावचे सरपंच रमेश हुमणे, पोलिस पाटील वैभव भागवत व इतर शेतकरी व गावकरी उपस्थित होते. प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्यांचे व कृषी अधिकाऱ्यांचे विशेष सहाय्य  लाभले. कार्यक्रमात गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.

कार्यक्रमासाठी 15  शेतकरी व 10 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, विषय तज्ञ डॉ. विरेश चव्हाण व डॉ. वैभव र राजेमहाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी होण्या करिता रावेचे केंद्र प्रमुख डॉ. जगदीश कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे, डॉ. मंदार पुरी, डॉ. आशिष  शिगवण  यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कृषी भूमिकन्या या गटाच्या सानिका पाटील, नेहा माने, सानिका महाडिक, ऋतुजा पाटील, साक्षी कातळकर, सुप्रिया घाणेकर, वैष्णवी दवणे, सानिका शिंदे, पंक्ती गोरिवले, सारिका पी यांनी अथक परिश्रम घेतले.