दापोली : तालुक्यातील वाकवली येथे १२ नोव्हेंबर रोजी राजाराम शिगवण यांचे शेतातील पाण्याच्या टाकीत कोणता तरी प्राणी पडल्याचे राजाराम शिगवण यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी तात्काळ वन्य जीव रक्षक तुषार महाडिक अणि मिलिंद गोरीवले यांना संपर्क करून यांची माहिती दिली.

पहाणी केली असता दुर्मिळ होत असलेले पाणमांजर ( Baby smooth coated otter ) असल्याचे समजले .

या घटनेची माहिती वन्य जीव रक्षक तुषार महाडिक यांनी वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) वैभव बोराटे अणि दापोली परिक्षेत्र वन अधिकारी प्र.ग.पाटील यांना माहिती दिली.

त्यांच्या मार्गदर्शना नुसार सा. स. सावंत वनपाल दापोली व गणपत जळणे ( वनरक्षक) यांनी घटनास्थळी येऊन पाणमांजर व्यवस्थित असल्याची खात्री केली.

त्या नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

असे कोणतेही जखमी वन्यजीव आढळल्यास वन विभाग दापोली अणि वन्य जीव रक्षक यांच्या जवळ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.