खेड १५:- शिमगोत्सवा निमित्त मुंबईहून कोकणात अनेक चाकरमानी येत आहेत. आज कोकणात येणाऱ्या कारने कशेडी घाटात पेट घेतला. या बर्निग कारच्या घटनेने परिसरात आगीचे लोळ उसळले होते. कारला आग लागल्याचे लक्षात येताच कार मधील प्रवासी बाहेर पडले. त्यामुळे जिवीत हानी झाली नाही. मात्र संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. छायाचित्रातील आगीच्या रौद्र रूपानेच कारची काय अवस्था झाली असेल हे दिसून येते. भर रस्त्यात पेट घेतल्याने काही काळ वाहतूक बंद झाली होती. दरम्यान वहातूक पोलीस घटनास्थळी पोहचले. वाहतूक सुरळीत सुरू झालीआहे.