रत्नागिरी : खेड(khed)मध्ये देवरुखच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव Nisha Jahav यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. रामदास कदम यांच्या मागणीनंतर पो. नि. सुर्वणा पत्की यांची जिल्हा बदली झाल्यानं खेडची जागा रिक्त झाली होती. (Nisha jadhav new police incharge of khed)

खेड तालुका हा राजकीय दृष्या संवेदनशील असल्यानं खेडला सहसा कोणी फार इच्छुक नसतं. डॅशिंग महिला पोलीस अधिकारी निशा जाधव या खेड पोलीस स्टेशनला योग्य प्रकारे न्याय देऊ शकतात. त्यामुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना खेडमध्ये पाठवलं आहे.

निशा जाधव यांचं स्वागत करताना सुवर्णा पत्की

सुरुवातीला सुवर्ण पत्की यांच्या जागी खेडमध्ये रायगडच्या बाळकृष्ण जाधव यांची बदली झाली होती. पण आता त्यात बदल होऊन देवरुखच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांची खेडला बदली करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. निशा जाधव यांच्या जागेवर देवरुख येथे मारुती जगताप यांची तर नाटे येथे आबासाहेब पाटील यांची बदली करण्यात आली आहे. गुहागरचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांची दाभोळ येथे करण्यात आली आहे.