रत्नागिरी | प्रतिनिधी
भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच कार्यकारिणी जाहीर केले आहे. यात माजी खासदार नीलेश राणे यांंची निवड केली आहे. यात शोभा फडणवीस, सुरेश हावरे, मुकुंद कुलकर्णी, रघुनाथ कुलकर्णी, सुधाकर देशमुख,व डॉ. सुनिल देशमूख, माजी आमदार मधु चव्हाण यांचाही समावेश आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे ती योग्य पद्धतीने निभावून पक्ष वाढीसाठी नेहमीच प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी यावेळी दिली आहे.