रत्नागिरी:- दापोलीतील स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्मचारी निलीमा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून लॅपटॉप जप्त केला. या लॅपटॉपमधील माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.
निलीमाच्या कामाची स्थिती व तिच्यावर कशा प्रकारचा कामाचा दबाव होता, यासंबंधी माहिती या लॅपटॉपमध्ये असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.
यातून अनेक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
निलीमाच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार निलीमा चव्हाण हिच्यावर कामाचा दबाव होता. तसेच तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी संशयित संशयित संग्राम सुनील गायकवाड (रा. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हा सातत्याने देत होता.
यातूनच आपल्या मुलीने आत्महत्या केली, अशी तक्रार त्यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात दिली.
त्यानुसार पोलिसांनी संग्राम गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तपासादरम्यान आरोपीच्या ताब्यात असलेला लॅपटॉप पोलिसांकडून जप्त करण्यात आला.
या लॅपटॉमध्ये निलीमाच्या कामासंदर्भातील माहिती असल्याचे सांगण्यात आले.