तालुकास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल व ज्यू. कॉलेजचं यश

दापोली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय दापोली आयोजित तालुकास्तरीय ज्यु . कॉलेज व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेज संघा विजेता ठरला. दिनांक २४ ऑगस्ट रोजी बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी येथे १९ वर्षाखालील मुले या गटातील व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला होता.

स्पर्धेत नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेज संघानं सर्वप्रथम दापोलीतील नामांकित ए. जी हायस्कूल वर अटीतटीच्या सामन्यात पहिला सेट १६-१४ तर दुसरा सेट १७-१५ पॉइंट्स ने जिंकला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरस बघायला मिळाली. शेवटी नॅशनल हायस्कूलने चांगला खेळ करत ए. जी हायस्कूलच्या संघावर मात केली.

अंतिम सामना नॅशनल हायस्कूलचा रामराजे ज्यु. कॉलेज दापोली यांच्याशी झाला. या एकतर्फी सामन्यात नॅशनल हायस्कूलनं यश संपादन केलं. या तालुकास्तरीय स्पर्धेत एकूण ६ संघांनी सहभाग नोंदवला होता. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, स्कूल कमिटी चेअरमन जावेद मणियार, कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेमन, संस्थेचे सचिव इकबाल परकार, प्रशाळेचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशाळेचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला व क्रीडा शिक्षक अशफाक खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*