दापोली: जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दापोलीच्या ज्युनिअर कॉलेज संघाने दापोलीतील वराडकर कॉलेजच्या संघावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या खेळाडूंना आणि मार्गदर्शक शिक्षकांना मुख्याध्यापक अय्युब मुल्ला, शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. खेळाडूंना मुख्याध्यापक अय्युब मुल्ला आणि क्रीडा शिक्षक प्रा. अशपाक खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार आणि ज्युनिअर कॉलेज समितीचे अध्यक्ष आरिफ मेमन यांनी यशस्वी खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.