दापोली: क्रिडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा 3 ऑक्टोबर 2025 रोजी नवनिर्माण हायस्कूल, रत्नागिरी येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत फातिमा मोहम्मद परकार इंग्लिश मिडीयम शाळा, दापोली येथील खेळाडू कु. मुसा शमशाद खान याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंमध्ये मुसाने आपल्या कौशल्याच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावला आणि कोल्हापूर येथील विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली.
मुसा आता 12 व 13 नोव्हेंबर 2025 रोजी रोडरेस महासैनिक दरबार हॉल, करवीर, कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष इक्बाल परकार, मुख्याध्यापक अशरफ आंजर्लेकर, उपाध्यक्ष व माध्यमिक विभाग शाळा समिती चेअरमन मुजीब रुमाने, प्राथमिक विभाग शाळा समिती चेअरमन मीनाज आंजर्लेकर, सीईओ यासीर परकार, क्रीडा मार्गदर्शक नाईकवाडी आणि वकार अफवारे तसेच पालक शमशाद खान यांनी मुसाचे अभिनंदन करत त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ही कामगिरी शाळेच्या इतिहासात उल्लेखनीय ठरली असून, मुसाने दापोलीचे नाव जिल्हास्तरावर गौरवाने उंचावले आहे.