रत्नागिरी: फिनोलेक्स इंडस्ट्रीज गेली 30 वर्ष रत्नागिरीमध्ये कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रमांना मदत करत आहे. यामध्ये पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, सामाजिक बांधिलकी, स्वच्छता, अशा गोष्टींमध्ये कार्यरत आहेत.
आजच्या या धावपळीच्या जगात माणूस खूप आजारांना बळी पडत आहे यात डायबिटीस व थॅलेसेमिया अशा प्रकारचा आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
डायबिटीसचे प्रमाण भारतात खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर थॅलेसेमिया एक रक्तविकार आहे. यामध्ये लहान मुलांच्या शरीरातील लाल रक्तपेशींची निर्मिती योग्य पद्धतीने होत नाही. सोबतच या पेशींचे आयुष्य देखील कमी असते.
शरीरातील लाल रक्त पेशींचे आयुष्य जवळपास 120 दिवसांचे असते पण थॅलेसेमिया या गुणांमध्ये या पेशी या पेशींचे केवळ आयुष्य २० दिवसाचे असते.
हा आजार वेळीच समजला तर त्याच्यावर नियंत्रण करणे फार अवघड नाही. म्हणूनच फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन एक समाजउपयोगी पाऊल टाकत गेल्या ५ वर्षापासून अशा तरुणांना लागणारे समुपदेशन, औषध, फिल्टर पुरवण्याचे काम चालू केले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीतील लांजा न्यू एज्युकेशन सोसायटी सिनियर कॉलेजमध्ये या शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.
या आजाराविषयी डॉ. नीता मुंशी व डॉ. नीलम भुसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अत्यंत माफक दरात विद्यार्थ्यांची रक्ताची तपासणी करण्यात आली व उर्वरित दर हे मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांच्यामार्फत अनुदानित करण्यात आले आहेत. यात एकूण २५० विद्यार्थ्यांनी तपासणी केली.
या कार्यक्रमाप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य व कर्मचारी वृंद यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.