मोबाईल व्हॅक्सीनेशनचे केले तोंडभरून कौतुक
रत्नागिरी : कोरोनाची चैन ब्रेक करायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. जिल्हा आरोग्य विभाग, रत्नागिरी नगर परिषद आणि रत्नागिरीत उद्योजक सौरभ मलूष्टे यांच्या सहकार्याने सुरू झालेले मोबाईल व्हॅक्सीनेशन हा स्तुत्य उपक्रम असून आणखीन 2 नव्या गाड्या उपलब्ध करून शहरात जेष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणार असल्याचे सांगत हा पॅटर्न रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. ते शहरातील राधाकृष्ण मंदिर येथे लसीकरण शुभरंभा प्रसंगी बोलत होते.
यावेळी खा. विनायक राऊत, नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, उद्योजक किरण सामंत, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे, राजन मलूष्टे, सौरभ मलूष्टे, हेमंत वणजु, दादा वणजू, विजय मलूष्टे, डॉ.लक्ष्मीकांत माने, अमेय वीरकर,केतन शेट्ये, मनोज साळवी,महेश संसारे, आदि उपस्थित होते.
आदर्शवत उपक्रम
यावेळी बोलताना ना. उदय सामंत यांनी उद्योजक सौरभ मलुष्ट्ये व पत्रकार हेमंत वणजू यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. हा आदर्शवत उपक्रम असल्याचे सांगून कौतुकाची थाप दिली.
हाच पॅटर्न राबवणार
लसीकरण केंद्रावरची गर्दी टाळण्यासाठी मोबाईल व्हॅक्सीनेशन उत्तम पर्याय असल्याचे सांगून हा पॅटर्न रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राबवला जाईल त्याचप्रमाणे रत्नागिरी शहरात आणखी दोन गाडया उपलब्ध करून जेष्ठ नागरिकांचे व्हॅक्सीनेशन पूर्ण करणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.