दापोली : नगरपंचायत निवडणुकीमध्ये आता मनसेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करताना दिसत आहे. येत्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही जास्तीत जास्त जागा लढवू, असं मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व दापोलीचे नेते सचिन गायकवाड यांनी म्हटलं आहे.

यंदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर मनसेची आघाडी होणार असल्याची चर्चा सुरू होती. पण राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी होणार याबाबतची चर्चा सुरू झाल्यानंतर मनसे राष्ट्रवादीचा विषय मागे पडला आहे.

गेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दापोलीतून मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. यंदाच्या निवडणुकीमध्ये प्लानिंग करून ते कामाला लागले आहेत.

आता मनसेनं या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

सचिन गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष – मनसे

सचिन गायकवाड यांनी म्हटलं आहे की,

मनसेप्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि वैभव खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीची तयारी जवळ जवळ पूर्ण केली आहे. दापोली शहरामध्ये मनसेला बळकटी देण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहे. शहरातील विकासकामांबाबत सातत्याने आवाज उठवण्याचं काम मनसेच्या माध्यमातून आम्ही केलं आहे. दापोलीतील जनता सुज्ञ आहे, ती योग्य निर्णय घेईल.

मनसेनं निवडणुकीची तयार जोरदारपणे सुरू केली आहे. आता या निवडणुकीमध्ये त्यांना किती जागांवर विजयश्री खेचून आणण्यात यश येतंय, ते 22 डिसेंबरलाच स्पष्ट होईल.