रत्नागिरी: महायुती सरकारच्या आर्थिक समृद्धीच्या ध्येयाला चालना देत, रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणांना हटवून आज विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन पार पडले.

मिरकरवाडा बंदराच्या टप्पा-२ अंतर्गत २२.४३ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा समावेश असून, यामध्ये लिलाव गृह, जाळी विणकाम गृह, प्रशासकीय इमारत, संरक्षक भिंत, विद्यमान जेट्टीचे सक्षमीकरण, पाण्याची टाकी, प्रसाधनगृह, काँक्रीट रस्ते आणि उत्तरेकडील ब्रेकवॉटरचे टॉप काँक्रीट यांचा समावेश आहे.

ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि मच्छीमार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार आणि मत्स्य विभाग कटिबद्ध आहे.
भविष्यात मिरकरवाडा बंदराला सक्षम आणि आधुनिक बंदर म्हणून विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या भूमिपूजन समारंभाला उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
मिरकरवाडा बंदराच्या विकासामुळे स्थानिक मच्छीमारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.