अल्पवयीन मुलीवर चार महिने बलात्कार

रत्नागिरी – इन्स्टाग्रामवर ओळख काढल्यानंतर अल्पवयीन मुलीला स्वतःच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर ४ महिने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

या अत्याचार प्रकरणी राजीवडा येथील संशयित तरुणाला शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

उजैफ तन्वीर वस्ता (२०, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. याबाबत पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तिची संशयित उजैफ बरोबर इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती.

या ओळखीचा फायदा घेत उजैफने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून सप्टेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या कालावधीत जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

तसेच तिला शिवीगाळ व दमदाटी करुन मारहाणही केली होती. याप्रकरणी पिडीतेने गुरुवार ६ जानेवारी रोजी शहर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी उजैफ विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली.

याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपअधिक्षक राजेश कानडे करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*