मंडणगड : ‘लोकनेते गोपिनाथजी मुंडे व पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांनी आपापल्या क्षेत्रात उतुंग कामगिरी बजावली आहे. ही दोन्ही नावे लाभलेल्या महाविद्यालायातील विध्यार्थी आपल्या महाविद्यालायाच्या नावाचा लौकिक नक्कीच वाढवतील, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला. ते सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ जालगाव या संस्थेच्या तालुक्यातील मंडणगड व कुंबळे येथील कनिष्ठ महाविद्यालयांच्या नामकरण सोहळ्यात बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, संस्थेच्या अध्यक्षा संपदा पारकर, उद्योजक ऋषी भटनागर, सामाजिक कार्यकर्ते महेश गणवे, अवधूत चव्हाण, प्राचार्य राहुल जाधव उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ जालगाव या संस्थेच्या तालुक्यातील मंडणगड व कुंबळे येथील कनिष्ठ महाविद्यालयांचे भागवत कराड यांच्या हस्ते नुकतेच ‘पद्मश्री कर्मवीर भि.रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड व कुंबळे’ असे नामकरण करण्यात आले.
ते पुढे म्हणाले दादा इदाते यांनी संघाच्या समरसता मंचाच्या माध्यमातून सामाज विकासाकरिता खूप मोठे काम केले आहे.
भटके विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे. महाविद्यालयाच्या सर्व घटकांनी हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत महाविद्यालायचा नावलौकिक वाढविला पाहिजे.
समाजाच्या विकासाकरिता दादा सतत कार्यमग्न असतात. यावेळी त्यांनी आपल्या खासदार निधीतून महाविद्याल्याच्या ग्रंथालयासाठी लाखांचा मदत जाहीर केली. पद्मश्री दादा इदाते यांनी या महाविद्यालायाच्या उभारणीमध्ये मुंडे साहेबांचे मोठे योगदान आहे. समाजाच्या सर्व स्थरातील हितचिंतकांच्या सहकार्यामूळेच संस्था प्रगतीपथावर वाटचाल करीत आहें असे सांगितले.
संस्थेच्या अध्यक्षा संपदा पारकर यांनी अध्यक्षीय समारोपात दादांच्या मार्गर्शनाखाली संस्थेने तळागाळातील विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेकानीय कामगिरी केली आहे, असं सांगितलं.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश गणवे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संत भगवानबाबा मात्र मंडळ व मंडणगड तालुका भाजपच्या वतीने डॉ. भागवत कराड यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीराम इदाते, कार्यवाह सतीश शेठ, सहकार्यवाह विश्वदास लोखंडे, संस्थेचे संचालक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, महेश गणवे, मुख्याध्यापक सुनील घाणेकर, भास्कर जायभाये, अनिल लोखंडे, श्रीरंग राणे, संदेश लोखंडे, नूरहसन कडवेकर, कुंबळे पंचक्रोशीतील मान्यवर पालक, कुंबळे व मुंडे महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावीक करून सर्व मान्यवराचे स्वागत केले. सुत्रसंचालन डॉ.संगीता घाडगे यांनी केले तर उपप्राचार्य वाल्मिक परहर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्याकम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.