रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १५ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत  अत्यावश्यक सेवा वगळता जिल्हा बंदीचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण प्रचंड वाढले आहेत. ती संख्या कमी व्हावी या हेतूनं जिल्हाधिकाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये काय सुरू आहे, काय बंद आहे? याची चर्चा सुरू आहे. खालील व्हिडिओमध्ये तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकणार आहेत.