रत्नागिरी : शहरात अंमली पदार्थ गांजा सेवन करणाऱ्या दोन इसमांविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कठोर कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या अंमली पदार्थाविरोधातील कडक कारवाईच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि. 19 एप्रिल 2025 रोजी रत्नागिरी शहरात गस्त घालत होते.
गस्तीदरम्यान, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरगांव, शेटयेवाडी येथील महालक्ष्मी मेडिकल स्टोअरच्या मागील बाजूस दोन इसम चिलीम सदृश्य साहित्याच्या सहाय्याने तोंडातून धूर काढत बसलेले आढळले. पथकाने त्यांची तपासणी केली असता, ते गांजा हा अंमली पदार्थ सेवन करत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पकडलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
1) शब्बीरअली शहानवाझ पटेल, वय 28 वर्षे, रा. घर नंबर 225, रहेबर मोहल्ला, साखरतर, ता. जि. रत्नागिरी
2) शफाकत हसन आदम राजपुरकर, वय 36 वर्षे, रा. घर नंबर 222, अकबर मोहल्ला, साखरतर, ता. जि. रत्नागिरी
सदर आरोपींविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक 152/2025 नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सपोनि प्रमोद वाघ, सपोफौ सुभाष भागणे, पोहवा शांताराम झोरे, बाळू पालकर, प्रवीण खांबे, अमित कदम, गणेश सावंत, विवेक रसाळ आणि योगेश शेटये यांनी पार पाडली.