दापोली : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D1 मधील सर्व क्लबच्या वतीने लायन्स क्लब दापोली तर्फे निसर्ग वादळात जोरदार तडाखा बसलेल्या ‘पाडले’ येथील सर्व वाड्याना जीवनावश्यक वस्तूंच्या 200 पॅकेट चे वाटप करण्यात आले.
यावेळी पाडले गाव चे सरपंच सौ. अक्षता हुमणे, उपसरपंच धाडवे व सर्व सदस्य यांनी भंडारवाडा, कोंडवाडी, ब्राम्हणअळी, गुहागरकरआळी, सापटआळी यांच्या वतीने 200 पॅकेटचा स्वीकार केला.
तसेच काही दिवसापूर्वी 100 सोलापुरी चादरी व 10 सतरंज्या पाजपंढरी गावात देण्यात आल्या. या सर्व वस्तू पाजपंढरी गावाचे पोलीस पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्या होत्या.
यावेळी ला. डाॅ. प्रशांत मेहता (कॅबिनेट ऑफिसर), ला. सुजय मेहता (झोन चेअरमन), मावळते अध्यक्ष ला. मंदार केळकर, नूतन अध्यक्ष ला. ॲड. ऋषिकेष भागवत, नूतन सेक्रेटरी ला. निलेष हेदुकर, ला. श्रीराम माजलेकर, ला.प्रमोद तलाठी, ला. ए. बी. सावंत,
ला. अशिष मेहता, ला. प्रसाद मेहता, ला. सत्यजित मालु, ला. मनोहर जैन, ला. रमेश जैन, ला. राजु करंदीकर, ला. अतुल मेहता, ला. अशिष अम्रृते, ला.केतन वणकर, ला.महेंद्र जैन,
ला. चेतन जैन, ला.बिपिन मयेकर, ला. फजल रखांगे हे हजर होते.
या लायन डिस्ट्रिक्ट मध्ये रत्नागिरी,सिधूदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे हे जिल्हे येतात. अजूनही टप्प्याटप्प्याने मदत करण्यात येणार आहे.