रत्नागिरीत अविनाश धर्माधिकारी यांचे “ऑपरेशन सिंदूर: पूर्वपीठिका आणि उत्तरदायित्व” या विषयावर व्याख्यान

रत्नागिरी : चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे निवृत्त सनदी अधिकारी आणि प्रख्यात अभ्यासू व्याख्याते अविनाश धर्माधिकारी यांचे “ऑपरेशन सिंदूर: पूर्वपीठिका आणि उत्तरदायित्व” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अनेक महिन्यांनंतर धर्माधिकारी यांचे व्याख्यान रत्नागिरीत होत असल्याने हा एक विशेष योग आहे.

“ऑपरेशन सिंदूर” आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रत्येक भारतीय नागरिक सचेत झाला आहे. या पार्श्वभूमीवर, धर्माधिकारी यांचे हे व्याख्यान रत्नागिरीकरांसाठी विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय यांच्या वतीने सर्व रत्नागिरीकरांना, विशेषत: युवावर्गाला, या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाच्या नेटक्या नियोजनासाठी सर्वांनी वेळेवर स्वा. सावरकर नाट्यगृहात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Tags: Avinash Dharmadhikari, Operation Sindoor, Ratnagiri, lecture, Chaturang Pratishthan, Ratnagiri District Library, Sawarkar Natyagruh, public event, youth engagement, awareness program

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*