मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे समुद्री कासव संवर्धनावर व्याख्यान

रत्नागिरी: कांदळवन सप्ताहानिमित्त मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे “समुद्री कासव संवर्धन” या विषयावर मोहन उपाध्ये यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान दिले.

जलजीविका संस्था आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात उपाध्ये यांनी समुद्री कासवाच्या सात प्रजाती, त्यांची ओळख, संवर्धनाची गरज आणि पद्धती याबाबत सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी प्रमुख पाहुणे मोहन उपाध्ये यांचे स्वागत करून आणि त्यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमाला जलजीविका संस्था, कांदळवन प्रतिष्ठान यांचे सदस्य, तसेच तंत्रनिकेतनचे कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्राध्यापक निलेश मिरजकर, रोहित बुरटे, सुशील कांबळे आणि कार्यालय अधीक्षक विलास यादव यांनी केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*