लांजा तालुका तायक्वांदो संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत 18 पदकांची लयलूट, त्रिशा यादव बेस्ट फायटर पुरस्काराने सन्मानित

चिपळूण: रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या अंतर्गत आणि शहानूर चिपळूण तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या सहकार्याने चिपळूण येथील पुष्कर स्वामी मंगल कार्यालयात 25 वी जिल्हा अजिंक्यपद तायक्वॉंदो स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.

या स्पर्धेत लांजा तालुका तायक्वांदो फिटनेस अकॅडमीच्या 30 खेळाडूंनी सहभाग घेऊन 18 पदकांची कमाई करत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.

यामध्ये त्रिशा गणेश यादव हिने 14 वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदकासह बेस्ट फायटर पुरस्कार पटकावला. तसेच राष्ट्रीय पंच, प्रशिक्षक आणि राष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांनी पंच म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

स्पर्धेचे उद्घाटन तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश राव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांत घडशी आणि संचालक संजय सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. लांजा तालुका तायक्वांदो फिटनेस अकॅडमीच्या खेळाडूंनी विविध गटांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले.

7 वर्षांखालील स्पेशल गट मुलींमध्ये स्वर्णीम श्रेयस शेट्ये हिने सुवर्णपदक, युगा प्रसाद डोर्ले आणि मायरा कुणाल जगताप यांनी रौप्यपदक, तर अन्वी सचिन पवार हिने कLv1 कांस्यपदक मिळवले. मुलांच्या गटात आराध्य महेश महाले याने सुवर्णपदक पटकावले.

सब ज्युनियर गटात त्रिशा गणेश यादव हिने सुवर्णपदक आणि बेस्ट फायटर पुरस्कार मिळवला.

कॅडेट गटात मुलींमध्ये भक्ती कुंभार, परी संजय जड्यार आणि तेजस्वी दशरथ लाड यांनी रौप्यपदके, तर तीर्था गणेश यादव हिने कांस्यपदक मिळवले.

कॅडेट मुलांच्या गटात रुद्र संजय सुर्वे याने सुवर्णपदक, सय्यद साद साजिद सलीम आणि भाव्य हरेश पटेल यांनी रौप्यपदके, तर नैतिक रामेश्वर शेट्ये याने कांस्यपदक पटकावले.

ज्युनियर मुलांच्या गटात योगेश ईश्वर तोंडारे याने सुवर्णपदक, तर राकेश बाळू पवार आणि श्रेयस समीर सावंत यांनी कांस्यपदके मिळवली.

याशिवाय आराध्य कमलाकर सावंत, दत्तप्रसाद संजय बावदनकर, आर्या सचिन पवार, वृत्ती रंजन पावसकर, रोहन चंद्रकांत साबळे, आदी रंजन पावसकर, भाविन विनोद पटेल, आफताब झहीर कोंडकरी, अब्दुल्ला रईस सय्यद, अर्ष म्युझिब कालसेकर आणि प्रतीक मंगेश कोतवडेकर यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

या यशस्वी खेळाडूंना लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस पावसकर, शितल आचरेकर, गौरव खेडेकर आणि गणेश तोंडारे यांचे मार्गदर्शन लाभले.

लांजा तालुका तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमीचे अध्यक्ष किशोर तुकाराम यादव, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सचिव तेजस्विनी आचरेकर, बचसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे, मार्गदर्शक तेजस वडवलकर आणि सर्व पालकांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*