दापोली : जेसीआय दापोली या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रामराजे महाविद्यालयाचे प्राध्यापक जेसी कुणाल मंडलिक यांनी दिमाखदार सोहळ्यात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारली. मावळते अध्यक्ष समीर कदम यांच्याकडून त्यांनी सूत्रं स्वीकारली.
जेसी प्रा. कुणाल मंडलिक हे रामराजे महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असून त्यांचा शैक्षणिक, सामाजिक व कला क्षेत्रांमध्ये भरघोस योगदान आहे, तसेच सन २०१८ मध्ये त्यांची जेसीआय या संस्थेच्या विभागीय प्रशिक्षकपदी देखील निवड झाली होती.
यावेळी उपाध्यक्ष जेसी ऋत्विक बापट, जेसी सुयोग भागवत, सचिव जेसी अतुल गोंदकर, सहसचिव फराज रखांगे आणि खजिनदार मयुरेश शेठ यांचा शपथविधी सोहळा पार पडला. नवीन मेंबर म्हणून माय कोकणचे संपादक मुश्ताक खान, डॉ. कुणाल मेहता, नितेश राऊत, सिद्धेश शिगवण यांनी शपथ घेतली.
हा सोहळा संदीप राजपुरे, झोन प्रेसिडेंट मल्लिकार्जुन कुकनूर, आयपीझेडपी संतोष ढेकणे, जेसीआय सिनेटर अमोल क्षीरसागर, जेसी गुरुनाथ मेटी यांच्या मार्गदर्शन खाली पार पडला.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट जेसी मेंबर (नवे)
1) जेसी मयुरेश शेठ
2)जेसी प्रसाद दाभोळे
उत्कृष्ट जेसी मेंबर
1) जेसी अतुल गोंदकर
2) जेसी फराज रखांगे
लोमचे उत्कृष्ट अधिकारी
1) जेसी डॉ. सुयोग भागवत
2) जेसी भूषण इस्वलकर
या जेसीआय म्हणजेच ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल या संस्थेचे कार्य दापोलीमध्ये सन २०१५ पासून सुरू आहे. जेसीआय दापोलीच्या माध्यमातून अनेक प्रकल्प व समाजपयोगी कार्यक्रम राबविले जात आहेत.