रत्नागिरी : खरीप हंगामासाठी जिल्ह्यामध्ये 6284.48 क्विंटल बियाण सध्या उपलब्ध आहेत. आतापर्यंत यापैकी 4940.67 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. यामध्ये डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचं कौतुक केलं पाहिजे. त्याचं कारण एवढत आहे की, त्यांच्या बियाणांना सर्वात जास्त मागणी आहे. कृषी विद्यापीठानं उपलब्ध केलेल्या बियाणांपैकी 99 टक्के विकले गेले आहे.
जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयामार्फत ही माहिती देण्यात आली आहे. महाबीजतर्फे जिल्ह्यात एकूण 982.10 क्विंटल बियाणे देण्यात आले आहे. त्यातील 772.52 क्विंटल विक्री झाली आहे. महाबीजतर्फे यंदा संकरित बियाणे देण्यात आलेले नाहीत.
खाजगी बियाणे कंपन्यांनी एकूण 4253.41 क्विंटल सुधारित बियाण विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले. त्यापैकी 3254.07 क्विंटलची विक्री झाली आहे. संकरित बियाणांच्या बाबतीत खाजगी कंपन्यांनी 675.59 क्विंटल बियाणे विक्रीस उपलब्ध करुन दिले. यापैकी 545.70 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे.
कोकण कृषि विद्यापीठातर्फे संशोधित वाणाचे 373.38 क्विंटल बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले. या वाणाला सर्वाधिक मागणी आहे. यापैकी 370.38 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. या बियाणांची विक्री 99 टक्के झाली आहे.
कोकण कृषी विद्यापीठानं आपला दर्जा कायम राखत, शेतकऱ्यांचा विश्वास मिळवण्यामध्ये यशस्वी झालं आहे.