माझे मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत हे भावनिक आणि संवेदनशील-पालक मंत्री उदय सामंत

मुंबई: राजकारणात संवेदनशील राहाणे नक्कीच चांगली गोष्ट आहे. परंतु सोशल मीडियावर पोस्ट करणे चुकीचं!!
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा यावर आपण आज ही ठाम असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे.

उदय सामंत पत्रकार परिषद

दरम्यान याबाबतचा मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जो निर्णय होईल तो मान्य असेल असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

किरण सामंत हे भावनिक आहेत, संवेदनशील आहेत. त्यामुळे त्यांनीही काल रात्री नऊ वाजता पोस्ट केली होती.परंतु त्यांना समजावून सांगितल्यावर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली आहे.

आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचा ठाम मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केल्याने आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाबाबत आणखीनच गुंता वाढला आहे

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्याला पक्षाने आदेश दिल्यास हा मतदारसंघ भाजपचा असून आपण तो लढवण्याची इच्छुक असल्याचेही जाहीर केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*