रत्नागिरी : सध्याची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी कोण उमेदवार होईल याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. नारायण राणे की किरण सामंत याबद्दल पैजा देखील लावल्या जात होत्या अखेर किरण सामंत यांचं  नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. माय कोकणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग  लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आलं आहे. धनुष्यबाण या चिन्हावर किरण सामंत या मतदारसंघातून उमेदवारी लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे!

गेल्या दोन आठवड्यांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे हे सुद्धा जोरदारपणे शक्ती प्रदर्शन करत होते. वेगवेगळ्या ठिकाणी सभांचं आयोजन केलं जात होतं. उमेदवारी आम्हालाच मिळावी असे दावे सुद्धा भाजपाकडून करण्यात येत होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील भाजपाच्या माध्यमातून करण्यात आले होते.

हीच परिस्थिती किरण सामंत यांच्याबाबत देखील होताना सगळे मतदार बघत होते. ते सुद्धा चिपळूण पासून सावंतवाडीपर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन लोकसभेची तयारी करताना दिसत होते.

परंतु आज माय कोकणच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार किरण सामंत हेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील हे दोन्ही भाजप आणि शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निश्चित केले आहे. कोणत्याही क्षणी याची अधिकृत घोषणा होऊ शकते!