नुसेबा सहीबोलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता दापोली पीआय राजेंद्र पाटील यांच्याकडे

दापोली : तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मोहल्ला येथील 6 वर्षीय मृत नुसेबा हनीफ सहीबोले हिच्या मृत्यू संदर्भात तपास दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहज. पूर्वी हा तपास दाभोळ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुरू होता. पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी गंभीर असून त्यांचा सर्व बाजूनं सखोल तपास करण्याचा मानस आहे

14 मार्च रोजी नुसेबाचा मृतदेह खाडीमध्ये सापडल्यानं खळबळ माजली होती. ही मुलगी १२ मार्च रोजी दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास भोपण मुस्लिम मोहल्ला येथे नुसेबा आणि तिचा भाऊ मोहम्मद सहीबोले हे दोघेही सायकल फिरवीत असता सायकल फिरवून झाल्यानंतर मोहम्मद सायकल ठेवण्यास घराकडे गेला. त्यावेळी नुसेबा तेथेच उभी होती. मोहम्मद सायकल ठेवून पुन्हा नुसेबाला घेण्यासाठी आला असता त्याला नुसेबा कोठेही आढळली नाही, म्हणून घरातल्या पालकांसह सर्वांनी गावात सर्वत्र शोधाशोध सुरू केली. पण तिचा काही पत्ता लागला नव्हता. पोलीसही परीसरात तळ ठोकून होते.
अखेर आज दिनांक 14 मार्च रोजी तिचा मृतदेह खाडीत सापडल्यानं गावावर शोककळा पसरली होती.

नक्की या प्रकरणी  काय झालं आहे? तिचा मृत्यू कशामुळे झाला आहे? याबद्दल सखोल तपास करण्यासाठी दापोली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याकडे तपास सोपवला गेला आहे. या प्रकरणी त्यांनी तपासाला सुरूवात केली आहे.

पोस्टमार्टेम अहवाल सुद्धा अजून सार्वजनिक करण्यात आलेला नाहीये. त्याबद्दलही गोपनीयता ठेवण्यात आली आहे. याबाबतील जनतेला उत्तर मिळणं आवश्यक याचा प्रशासनानं विचार करणं गरजेचं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*