खेड पोलीसांनी जप्त केला 8 लाख 640 रुपयांचा गुटखा

खेड : गुरुवारी 02/12/2021 रोजी तय्यब सत्तार मेमन वय-३९ वर्षे (रा.गवळीवाडी, घाणेखुंट, ता.खेड जि. रत्नागिरी) याच्या घाणेखुंट येथील गोडाऊनमध्ये बंदी असलेल्या गुटख्याचा साठा असल्याबाबत गुप्त माहिती पोलिसांना मिळली होती. गुरुवारी रात्री 8:10 वा. चे सुमारास धाड टाकून त्याच्याकडून सुमारे 8 लाख 640 रुपये किंमतीचा आरएमडी व विमल गुटखा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकीरण काशीद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे तपास पथक प्रमुख सपोनि सुजित गडदे, परी.पोउपनि योगेश मोरे, ए.एस. आय.हघाणेकर, पोशी/संकेत गुरव, पोशी/विनायक येलकर, पोशी/रुपेश पेढामकर यांच्या पथकाने केली.

या प्रकरणात तय्यब इसमावर गुन्हा करून त्यास अटक करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*