दापोलीचे सुपुत्र मजीद चिकटे निर्मित ‘आय एम सॉरी’चा पोस्टर रिलीज

दापोली : मजीद चिकटे दापोलीतील सुप्रसिद्ध विकासक, पण त्यांनी आपलं नशीब मराठी सिनेमामध्ये आजमावायचं ठरवलं आहे. त्यांचा बहुचर्चीत ‘आय एम सॉरी’ या सिनेमाचा पोस्टर नुकताच लाँच झाला.

१३ मे २०२२ रोजी मजीद चिकटे यांचा हा सिनेमा महाराष्ट्रातील सिनेमागृहात रिलीज हाणार आहे. चित्रपटाचं पोस्टर अतीशय कलरफुल आहे. या पोस्टर प्रमाणेच या सिनेमाची कथासुद्धा आताच्या पिढीला एक वेगळा रंग देऊन जाईल.

निर्माता मजीद चिकटे

हा सिनेमा एम. जे. फिल्मस् निर्मित आहे. कार्यकारी निर्माता रविंद्र जाधव लेखक दिग्दर्शक आणि संकलन दिपक भागवत, सिनेमोटोग्राफी ओम नारायण व सहाय्यक उदय कुमार प्रोडक्शन  मॅनेजर, कास्टिंग डिरेक्टर व कॉस्टुम डिझाइनर चैत्राली डोंगरे, संगीत दिग्दर्शक सॅम ए. आर., ब्याग्राऊंड म्युझिक ग्याब्रिइल सोलोमनी, मेकअप नागेश कस्तुरी, आर्ट डिरेक्टर संतोष फुटाणे, साउंड डिझायन प्रशांत कांबळे  प्रोडक्शन व सहाय्यक. दिग्दर्शक किसन चव्हाण, पोस्टर डिझाईन डिजिलूक्स स्टुडिओ, डिजिटल एजन्सी  व्हिज्युअल जंकीज यांच्या सहाय्यानं पोस्टर प्रकाशन झालं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*