रत्नागिरी : एक अनोळखी प्रेमाची कथा तुम्हाला “आय एम सॉरी” या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे संगीत आपल्या भेटीला लवकरच येत आहे.

13 मे 2022 रोजी ‘आय एम सॉरी’ चित्रपट रिलीज होतोय. नुकताच त्याचा कलरफुल पोस्टर रिलीज झालाय. या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे.

दरम्यान लवकरच या चित्रपटाची गाणी रिलीज होणार आहेत. यासाठी संगीत दिग्दर्शक सॅम ए. आर. यांनी अप्रतिम संगीत दिले आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत जी तुम्हाला प्रेमात पडायला भाग पडणार हे नक्की. काही दिवसातच झी वर तुम्ही गाणी बघू शकता.

सुप्रसिद्ध गायक जावेद अली, आनंदी
जोशी, रिशीका मुखर्जी, पार्वथी नायर, शुभम दिवेकर, कॅपटीव, फरहान साबरी यांच्या मधुर आवाजात चित्रपटाची गाणी आहेत.

I am सॉरी चित्रपटाची कथा मनाचा ठाव घेणारी आहे. आपल्या नजीकच्या सिनेमागृहात हा चित्रपट नक्की पहायला जा.