रत्नागिरी : राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी 16 जुलै रोजी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची धडधड वाढली आहे. बारावीचा निकाल खालील तीन वेबसाईट्सवर पाहायला मिळू शकणार आहे.

  1. hscresult.mkcl.org
  2. mahresult.nic.in 
  3. maharashtraeduction.com

उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये पार पडली परीक्षा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली. कोरोना संकटामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबले आहेत. एरव्ही मे महिन्यात जाहीर होणारा बारावीचा निकाल जाहीर होण्यासाठी यंदा जुलै महिना उजाडला. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही 15 जुलैपर्यंत बारावीचा तर जुलैअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे उद्या निकाल लागणार आहे.