
दापोली : शहरातील बाजारपेठेत ४ एप्रिल २०२६ रोजी लागलेल्या भीषण आगीत पाच दुकानांचे मोठे नुकसान झाले होते. यापैकी दोन गरजू दुकानदारांना पुन्हा आपला व्यवसाय उभा करण्यासाठी दापोली शहर व्यापारी संघटनेच्या वतीने आज २ लाख ७० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले.
इतर तीन दुकानदारांनी स्वतःहून ही मदत घेण्यास नकार दिला. संघटनेचे अध्यक्ष संदीप राजपुरे, विश्वस्त दिनेश नायक, उपाध्यक्ष राकेश कोटिया, कौशिक मेहता, सचिव दिनेश जैन आणि योगेश पिंपळे यांच्या हस्ते हा मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
आगीच्या रात्री स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मदतीसाठी धावून आलेल्या स्थानिक तरुणांचा आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
यामध्ये साई मोरे, विकास पालटे, गणेश सकपाळ, सचिन झगडे, विजय धोपट, प्रतीक दळवी, तसेच नगरपंचायतीची बुलेट फायटर बाईक घेऊन आलेले अमित रेमजे आणि खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश होता.
खजिनदार माणिक दाभोळे, जावेद मणियार आणि सचिन गायकवाड यांच्या हस्ते या मदतनिसांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी बाजारपेठेतील प्रमुख व्यापारी राजू बुटाला, प्रमोद पांगारकर, प्रशांत शेठ, दिलीप जैन, महेश जैन, राकेश माळी, शांतीलाल जैन, परेश आणि चेतन जैन, ॐकार कर्वे, राजू पेठकर, केदार तटकरे, संदीप महाजन, गणेश घाडगे, पारस गुर्जर, दिलीप दुर्गावळे, किरण विचारे, मंदार केळकर, दिलीप भैरमकर, रुपालाल व लक्ष्मण चौधरी, चंदर जगदाळे तसेच साद बुरोंडकर, म्हामणकर आणि रिहान उपस्थित होते.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यापाऱ्यांनी वापरलेल्या ‘फायर बॉल’ तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. अध्यक्ष संदीप राजपुरे यांनी आपल्या मनोगतातून सर्व व्यापारी बांधवांना भविष्यात सतर्क राहण्याचे आणि एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply