सोन्या-चांदीचे भाव उतरले, सोन्याच्या किंमतीत ८०० रुपयांनी घसरण

मुंबई : गेल्या दहा दिवसात देशात सोन्याचे भाव कमालीचे उतरले आहे. मंगळवारी मुंबईच्या बाजारात सोन्याचा भाव ८०० रुपयांनी घसरल्याचं पहायला मिळालंय. मुंबईत बुधवारी सकाळी २२ कॅरेटच्या सोन्याचा भाव हा ४३,००० रुपये इतका आहे तर २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ४४,००० इतका आहे. चांदीच्या दराचा विचार करता एक किलो चांदीचा भाव ६६,००० हजार इतका झाला आहे. अमेरिकन बाजारात सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळालंय. सोन्याच्या भावात १२.२४ डॉलर अर्थात ०.७० टक्के घसरण झाल्याचं पहायला मिळालंय तर चांदीच्या भावात ०.९७ डॉलर अर्थात ३.६९ टक्के घसरण झाली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*