रत्नागिरी : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
हा कार्यक्रम शनिवार, ५ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते ११:३० वाजता चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी वन वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतही विशेष कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) रणजित गायकवाड आणि विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक) गिरिजा देसाई यांनी दिली.
या कार्यक्रमाला गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत उपस्थित राहणार आहेत. तसेच, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.