दाभोळ (सुयोग वैद्य) : शासन आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पारंपरिक मच्छीमार कर्जबाजारी झालाच आहे आणि आता परप्रांतीय फास्टर फिशिंग बोटीमुळे आमच्यावर उपासमारीचीही वेळ आली आहे, अशी भूमिका मच्छिमार बांधवांनी व्यक्त केली आहे.
आधीच कोरोनाचं संकट पाठ सोडायला तयार नाही त्यात परप्रांतीय बोटींनी बेजार केलं आहे. अशा परिस्थितीत पारंपारिक मच्छिमारांनी दाद मागायची तर कुठे?
पक्ष कुठलाही असो मच्छिमारांची फसवा फसवी काही थांबायला तयार नाही. सध्या 8 ते 10 नोटिकल्स माईलमध्ये परप्रांतीय फास्टर बोटी फिशिंग करत आहे.
तरीसुद्धा प्रशासन झोपा काढत आहे अशा खरमरीत शब्दात मच्छीमारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
स्थानिक मच्छिमारांना आणि पारंपरिक मच्छीमारांना त्रास द्यायचा आणि परप्रांतीय फास्टर बोटींच्या फिशिंग वर डोळेझाक करायची अशी प्रशासनाची असलेली भूमिका योग्य नाही असा नाराजीचा सूर उमटत आहे.
या अभूतपूर्व परिस्थितीतून आम्हाला वाचवा, नाहीतर आमची परिस्थिती खूप वाईट होईल अशी विनंतीही मच्छीमारांनी केली आहे.