रत्नागिरी : फेसबुकवरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत संगमेश्वरच्या एका तरूणाने लग्नाचं आमिष दाखवत तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

पण नंतर लग्न करणाऱ्यास नकार दिल्यानं तरूणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी संशयिताला पोलीसांनी अटक करून न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने गुरुवारी त्याला एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

घटना सन २०१६ ते सन २०२० या कालावधीत घडली आहे. करण महेश शेणवी (२५, रा. करंजारी संगमेश्वर, रत्नागिरी) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.

पीडित तरुणीच्या तक्रार प्रमाणे, २०१५ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून तिची करणशी ओळख झाली होती.

या ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यावर करणने तिला लग्नाचे आमिष दाखवून ठाणे, बांद्रा, गणपतीपुळे, आरोग्य मंदिर, कारवांचीवाडी याठिकाणी तिच्याशी संबंध प्रस्थापित केले.

परंतु त्यानंतर करणने पीडितेशी लग्न करण्यास नकार दिल्याने तिने ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली.

तक्रारीनुसार ग्रामीण पोलिसांनी करण शेणवीला अटक करून गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी एक दिवसाच्या पोलिस कोठडीत केली.