[wpedon id=”1120″ align=”center”]
दापोली – राज्यातील लाखो प्राथमिक शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेचा 58 वा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धांचा सन्मान केला गेला.
दरवर्षी समाज पूरक व बालकेंद्रीत उपक्रमांनी सजलेल्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, मात्र यावर्षी राज्यात कोरोना महामारीमूळे उद्धवलेल्या परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या योद्ध्यांना हा वर्धापन दिन समर्पित करण्याचा निर्णय संघटनेचे अध्यक्ष मुकुंद कासारे व सरचिटणीस जावेद शेख यांनी घेतला होता.
दापोली तालुक्यात कोरोनामूळे उद्धभवलेल्या परिस्थितीशी यशस्वीपणे सामना करत समाजात कोरोना विरूद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण करणारे उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, पं.स.सभापती रऊफ हजवानी, उपसभापती ममता शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश शेठ, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, दापोली न. पं. नगराध्यक्षा परवीन शेख, मुख्याधिकारी कविता बोरकर, गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले, शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक विनोदकुमार रामपूरे, जालगांव सरपंच श्रृती गोलांबडे, तालुका आरोग्य अधिकारी शिवा बिरादार तथा उपजिल्हा रूग्णालयातील आरोग्य अधिकारी महेश भागवत यांना त्यांच्या कार्यालयात जावून कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्या बाबतचे सन्मानपञ देवून त्यांच्या यथोचित गौरव करण्यात आला.
कोरोना परिस्थिती निर्माण झाल्या पासून शिक्षकांनीही समाजिक भान बाळगत कोविड – 19 अंतर्गत कोविड सर्वेक्षण, पोलिस मिञ, विलगीकरण कक्ष, स्वस्त धान्य दुकान इ. सेवा स्विकारत कोरोना विरूद्धच्या लढ्यात प्रशासनास भक्कम साथ दिली अशा सुमारे 300 शिक्षकांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानपञ देवून गौरव करण्यास सुरूवात झाली आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक वाळंज, सुरेश पाटील, अंकुश गोफणे, मंगेश कडवईकर, रामकृष्ण लिंगायत, सुग्रीव गुट्टे, माधव तिरूके, स्वप्निल परकाळे, ज्ञानेश्वर कासार, विश्वजीत सावंत, तिमसेकर आदींनी परिश्रम घेतले.