कोकण कृषी विद्यापीठ झाडांना देतंय जीवनदान

निसर्ग चक्रिवादळात अनेक महावृक्ष उन्मळून पडले. आपल्या लेकीप्रमाणे जपलेल्या या वृक्षांना उन्मळून पडलेले पाहून त्यांच्या पालनकर्त्यांसह सारेच हळहळले.

दापोली तालुक्यातील वेळवी येथे उन्मळून पडलेल्या नऊ आम्रवृक्षांना दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख डाॅ संतोष वरवडेकर, समीर झगडे, राजेंद्र आग्रे, राजेश गोरिवले, संतोष बुरटे आणि चंद्रकांत कांबळे यांनी प्रत्यारोपण करून जीवनदान दिले.

हा आदर्श घेऊन शक्य त्या वृक्षांना उभे करता येईल. ज्या नागरिकांना वृक्षप्रत्यारोपण करायचे असेल त्यांनी कृषी विद्यापीठ दापोलीचे माहिती तंत्रज्ञान केंद्राकडे संपर्क करण्याचे आवाहन डाॅ. संतोष वरवडेकर यांनी केले आहे. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9404161435.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*