दापोलीत विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू

दापोली: तालुक्यातील करजगाव-बुरुमवाडी येथे विहिरीत पडून सहदेव बाबाजी चांदवडे (वय ७१) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. १० मे) दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी मृताच्या मुलाने, संदेश सहदेव चांदवडे (मूळ गाव करजगाव-बुरुमवाडी, सध्या राहणार मोरेगाव, नालासोपारा, मुंबई) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश चांदवडे शनिवारी गावातील पूजेचे विसर्जन करण्यासाठी तामसतीर्थ येथे समुद्रकिनारी गेले होते. तेथून घरी परतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांचा शोध घेतला.

शोधादरम्यान, घरासमोरील विहिरीत वडील पाण्यात पडलेले दिसले. संदेश यांनी तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना विहिरीबाहेर काढले आणि दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर सहदेव चांदवडे यांना मृत घोषित केले. या घटनेची दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*