रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

महाराष्ट्र दहावी निकाल 2025: कोकण विभाग 99.82% सह अव्वल, मुलींनी मारली बाजी

महाराष्ट्र दहावी निकाल 2025: कोकण विभाग 99.82% सह अव्वल, मुलींनी मारली बाजी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने 99.82 टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले आहे, तर नागपूर विभाग 90.78 टक्क्यांसह तळाला आहे.

यंदाही मुलींनी मुलांवर मात केली असून, मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 96.14 टक्के, तर मुलांची टक्केवारी 92.21 टक्के आहे.

विभागनिहाय निकालाची टक्केवारी:

  • कोकण: 99.82 टक्के
  • पुणे: 94.81 टक्के
  • नागपूर: 90.78 टक्के
  • संभाजीनगर: 92.82 टक्के
  • मुंबई: 95.84 टक्के
  • कोल्हापूर: 96.78 टक्के
  • अमरावती: 92.95 टक्के
  • नाशिक: 93.04 टक्के
  • लातूर: 92.77 टक्के

कोकण विभागाने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मुलींच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

10th Board Results, Academic Achievement, Education Board, Girls Top, Konkan Division, Maharashtra SSC Results, my kokan, Nagpur Division, Percentage, ratnagiri, Student Success

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *