देवरुख एसटी आगारात मद्यधुंद कर्मचाऱ्याचा राडा; तालुकाप्रमुखावर हेल्मेटने हल्ला

देवरुख – देवरुख एसटी आगारात एका मद्यधुंद कर्मचाऱ्याने गुरुवारी (दि.१३) मोठा राडा घातला.

संतोष राठोड नावाच्या या चालक-वाहकाने दारूच्या नशेत अधिकारी वर्गाशी गैरवर्तन केले.

तसेच, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर यांच्यावर हेल्मेटने हल्ला केला.

याप्रकरणी राठोड याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

  • देवरुख एसटी आगारात संतोष राठोड चालक तथा वाहक म्हणून कार्यरत आहे.
  • गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास, राठोड दारूच्या नशेत आगारात आला.
  • ड्युटी लावण्यावरून आणि अन्य क्षुल्लक कारणांवरून त्याने अधिकारी वर्गाशी हुज्जत घातली आणि अर्वाच्च भाषेत बोलला.
  • त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने वाहतूक निरीक्षक कैलास साबळे यांच्या दालनात बसलेले बंड्या बोरुकर यांच्यावर हेल्मेटने हल्ला केला.
  • या हल्ल्यात बोरुकर यांच्या कानाला दुखापत झाली.
  • वाहतूक निरीक्षक कैलास साबळे यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
  • त्यानुसार, संतोष राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांची भूमिका
“संतोष राठोड याच्याकडून यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. आजचा घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला आहे.”, असे वाहतूक निरीक्षक कैलास साबळे यांनी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*